Home Uncategorized अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,आयोजित

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,आयोजित

77
0

‘नाट्य परिषद करंडक २०२५’
*प्राथमिक फेरी – २३, २४ ऑगस्ट

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२५’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरी शनिवार, २३व रविवार, २४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मुंबई केंद्रासाठी समन्वयक म्हणून विजय सूर्यवंशी (मो. ९८६९७९६२६२) कामकाज पाहणार आहेत. या केंद्रात एकूण १५ संघ सहभागी झाले असून, यामध्ये सुरत येथील एका संघाचा समावेश आहे.

ही प्राथमिक फेरी दोन्ही दिवस सकाळी १०वाजल्यापासून, जयश्री जयंत साळगावकर रंगमंच (मिनी थिएटर), यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई-१६ येथे तालीम स्वरूपात पार पडणार आहे.

सहभागी संस्था व एकांकिका
•सुप्रभा चेरीटेबल ट्रस्ट – पन्नाशीची ऐशीतैशी
•बाळगंगा रंगभूमी (मुंबई ) -काटेरी येल
•जोकर्स थिएटर -क्राइंग क्लब
•अमर हिंद मंडळ – रेशनकार्ड
•नाटकनामा थिएटर -बिझनेस क्लास
•आकांक्षा फाउंडेशन मुंबई- अजून उजाडत नाही गं
•नक्षत्र कलामंच,मुंबई- स्पर्शाची गोष्ट
•श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई (नाट्यसाधक) – मोक्ष

*रविवार, २४ ऑगस्ट*
•स्वारंभ कल्चरल फाउंडेशन- सिमंतिनी
•गंधर्व कलामंच- अग अग आई
•शब्द स्पर्श प्रोडक्शन -पहिले प्रेम
•कोहिनूर क्रिएशन, मुंबई-बाबू बँड बाजा
•मोरया कलामंच-समुद्र
•स्वायत्त क्रिएशन- टिक टिक
•कलासक्त मुंबई -पेंडूलम

या स्पर्धेची अंतिम फेरी दि. १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here