Home Uncategorized मुर्ती सजावटकार संजीवनी ढोले यांच्या, आकर्षक मुर्तीना वाढती मागणी…

मुर्ती सजावटकार संजीवनी ढोले यांच्या, आकर्षक मुर्तीना वाढती मागणी…

66
0

सजावटकार संजीवनी ढोले यांच्या कलेमुळे,चारकोप मध्ये, मुर्ती सजावटीचे वाढते आकर्षण….

 

*राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे.सार्वजनिक गणपतीचे आगमन सर्वत्र होत असून, सध्या मुर्तिकार घरगुती मुर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत. बाजारपेठा विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. काही राजकीय मंडळी,चाकरमान्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बस अथवा रेल्वे यांची सोय करून देत आहेत. मुलेही बाप्पाच्या आगमनासाठी सजावट करण्यात दंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कांदिवली
अनिल चासकर

कांदिवली, चारकोप परिसरात म्हाडाची फार मोठी वसाहत आहे. इथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरगुती श्री गणेशमुर्तीची अनेक विक्री कला केंद्रे या भागात आहेत. यामुळे येथे श्री मुर्ती सजावटीचे वेगळे आकर्षण पाहायला मिळते.

विक्रेते अनिकेत ढोले यांच्या श्री साई सिद्धी आर्ट केंद्रात सजावटकार संजीवनी ढोले या गणेशमुर्तीना आपल्या कलेतून आकर्षक बनवतात. मणी, डायमंड, टिकल्या, झालर आणि विविध प्रकारच्या लेस वापरून मुकुट, पितांबर, आसन यांसह सोंड, कान, हातावरील दागिने, डोक्यावर मुकुट वा फेटा सजवतात.
गेल्या सहा वर्षांपासून सदर कला साकारात असल्याने, मागणीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. पहिल्या वर्षी ४५ मूर्तीला पसंती मिळाली, आकर्षक, आभुषणे आणि विलोभनीय मुर्ती यामुळे यावर्षी १२६ सजावट केलेल्याcमुर्ती नोंद झाल्या असल्याचे समाधान संजीवनी ढोले यांनी व्यक्त केले. एका मुर्तीला दोन ते तीन दिवस लागतात. काम बारकाईने सातत्य, चिकाटी, ठेऊनच करावे लागते. सजावटी
नुसार एका सजावट केलेल्या मुर्तीच्या किमतीत ५०० ते १५०० रुपये वाढ होते; मात्र भक्त ते आनंदाने देतात.तुमच्या आवडीने सवडीने करा असेही आवर्जून सांगतात.

____________
अलंकार सजावटकार संजीवनी ढोले

काही भक्त त्यांच्या आवडीनुसार सजावट
करण्यास सांगतात. मुकुटामध्ये हाच डायमंड वापरा, हीच लेस वा झालर फिरवा, कर्ण अलंकार सजवा, असे सुचवितात यामुळे मलाही शिकण्यासाठी वाव मिळतो,माझी कला वृंद्धीगत होत आहे.. असे त्या सांगतात.

________________
दागिन्यांच्या मूर्तीना भक्तांची पसंती….
_______________
गणेशभक्तांकडून आकर्षक सजावट असलेल्या मूर्तीना अधिक पसंती मिळत आहे. गणेश मूर्तीवर कोणते दागिने बसवले आहेत हे पाहून अनेकजण मूर्ती पसंत करतात तर काही भक्त मंडळी हक्काने काही दागिने मूर्तीवर असावेत, अशी मागणी करत असल्याचे येथील मूर्तीकारांचे म्हणणे आहे. यामुळे मूर्तीची किंमत ५०० ते १५०० रुपयंनी वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
_______

 

चारकोप: गणपती मूर्तीला अलंकाराने सजवताना महिला सजावटकार,
संजीवनी ढोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here