Home Uncategorized *गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयातील सेवा सुरळीत*

*गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयातील सेवा सुरळीत*

68
0

*अतिरिक्त डॉक्टरांच्या उपलब्धततेमुळे विविध विभागांच्या वैद्यकीय सेवा पूर्ववत*

गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयातील वैद्यकीय अतिदक्षता विभाग (MICU) येथील सेवा नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे. या सेवेमुळे गोवंडी, मानखुर्द, चेंबूर या परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने दिलासा मिळणार आहे. रूग्णालयातील डॉक्टर अतिदक्षता विभाग, रूग्ण कक्ष आणि बाह्य रूग्ण विभाग येथे पुरेशा संख्येने डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी कालबद्ध पद्धतीने डॉक्टरांची नेमणूक करण्यात येते. ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीसाठी रूग्णालयातील विविध सेवांसाठी पुरेसे डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत. पुरेशा संख्येने डॉक्टर्स रूजू झाल्यामुळे योग्य तयारीनंतर तसेच पूर्ण व्यवस्थेनंतर रूग्णालयातील अतिदक्षता सेवा सुरू करण्यात आली आहे.

पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयामध्ये बाह्य रूग्ण विभागातील विविध सेवांसाठी दररोज ६०० ते ७०० रूग्ण येतात. विविध सेवांसाठी आतापर्यंत ४ निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून सेवा देण्यात येत होती. या संख्येत आणखी ५ निवासी वैद्यकीय अधिकारी यांची भर पडली आहे. त्यामुळे रूग्णालयातील सेवा सुरळीतपणे कार्यान्वित झाली आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here