Home मुंबई अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री दर्शनासाठी *श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाची जय्यत तयारी.*

अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री दर्शनासाठी *श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाची जय्यत तयारी.*

84
0

अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री दर्शनासाठी

*श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाची नेटकी तयारी.*

 

श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास
, प्रभादेवी, मुंबर्इच्या वतीने मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजीच्या
अंगारकी संकष्टी चतुर्थी रोजी भाविकांच्या श्री दर्शन सुलभतेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्याकरता विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी न्यायाचे अध्यक्ष सदा सरवणकर (राज्य मंत्री दर्जा )यांनी नियोजनाची माहिती दिली. याप्रसंगी कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी ,विश्वस्त गोपाळ दळवी, महेश मुदलियार,राहूल लोंढे,सुदर्शन सांगळे,मनिषा तुपे तसेच मुख्‍य व्यवस्थापकीय अधिकारी वीणा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अंगारकी निमित्त विशेष पुजा व आरती दर्शन व इतर व्यवस्थेची माहिती देण्यात आली.

‘‘श्रीं’’ च्या दर्शनाच्या वेळा
सोमवार मध्यरात्रौ १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत. पहाटे ३.५० ते रात्रौ ०९.०० वाजेपर्यंत.रात्रौ ०९.३० ते रात्रौ ११.५० वाजेपर्यंत आहेत.

भाविकांना न्यासातर्फे देण्यात येणार्‍या सोयी पुढील प्रमाणे

सिध्दिविनायक अॅपद्वारे ‘‘श्रीं’’ च्या दर्शनाचे प्रक्षेपण
पुरूष व स्त्रियांच्या रांगेकरीता मंडप
मोफत चप्पल स्टॅडची व्यवस्था मंडपातच
मुखदर्शनार्थींसाठी चप्पल स्टॅड व्यवस्था सिध्दि प्रवेशव्दार बाहेरील पार्कीगजवळ करण्यात येणार आहे.

दूरून श्री दर्शनाची व्यवस्था एस.के.बोले मार्गावरील मंदिर प्रवेशद्वार क्र. १ मधून असेल

मंदिरातर्फ रुग्णवाहिका ,पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीसाठी व्यवस्था .

भाविकांकरिता मंदिरातर्फे विनामूल्य चहाची व्यवस्था .

सूचना*
मंदिरातर्फे विविध सूचना फलक, बॅनर्स, मार्गदर्शिका फलक असतील.
श्रीं च्या दर्शनाकरिता येताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू (कॅमेरा, लॅपटॉप, इ.) आणू नये

दर्शन रांग व्यवस्था
आशिर्वचन पूजा रांग
सिध्दि प्रवेशव्दार येथील सुरक्षा भिंत साने गुरुजी उद्यान येथील मंडप मंदिर प्रवेशव्दार क्र.३ गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :-
मंदिर प्रवेशव्दार क्र. ३ रिध्दी प्रवेशव्दार (काकासाहेब गाडगीळ मार्ग)

राजे संभाजी उद्यान प्रवेशव्दार (रविंद्र नाटय मंदिर शेजारी) मंडप प्रतिक्षालय इमारत गेट क्र. ६ प्रतिक्षालय इमारत प्रांगणातील रेलींग प्रवेशव्दार क्र. ७ गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :-

मंदिर प्रवेशव्दार क्र. ३ रिध्दी प्रवेशव्दार (काकासाहेब गाडगीळ मार्ग)

राजे संभाजी उद्यान प्रवेशव्दार (रविंद्र नाटय मंदिर शेजारी) मंडप पत्रा गेट प्रवेशव्दार क्र. ४ गाभारा
बाहेर पडण्याचा मार्ग :-

मंदिर प्रवेशव्दार क्र. ३ रिध्दी प्रवेशव्दार (काकासाहेब गाडगीळ मार्ग)

मुख दर्शनाची दुरून रांग
एस.के बोले मार्ग आगर बाजार हरदेव कृपा दुकान सिध्दि प्रवेशद्वार मंदिर प्रवेशव्दार क्र. ७
बाहेर पडण्याचा मार्ग :-

मंदिर प्रवेशव्दार क्र. १ सिध्दी प्रवेशव्दार (एस. के. बोले मार्ग)

ज्येष्ठ नागरीक/नवजात बालक/दिव्यांग व्यक्ती/गरोदर स्त्रिया रांग

रिध्दी प्रवेशद्वारातून (काकासाहेब गाडगीळ मार्ग) प्रवेशव्दार क्र. ५ गाभारा

बाहेर पडण्याचा मार्ग :-

प्रवेशव्दार क्र. 3रिध्दी प्रवेशव्दार (काकासाहेब गाडगीळ मार्ग)

गाभारा परिसरात वैद्यकीय पथक कोणत्याही भाविकांस शारीरीक त्रास झाल्यास त्यांच्यासाठी २ रुग्णवाहिकांची व्यवस्था असून त्यात एक कार्डीयक रुग्णवाहिकाही आहे.

महिला व पुरूषांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये लार्इटस, पंखे, पिण्याचे पाणी, चहा, मोबार्इल टॉयलेट इत्यादी व्यवस्था.

लाडू /प्रसादाचे काऊंटर सिध्दि चेकपोस्ट व रिध्दि चेकपोस्टच्या बाहेरील बाजूस असेल.

फायर इंजिनची व्यवस्था, फायर एक्सटंग्विशर, फायर बकेट व फायर मार्शल फायर इंजिन/अग्निशामक वाहन छत्रपती राजेसंभाजी उद्यान येथे ठेवण्यात येणार आहे.

बेस्टचाअखंडित विद्युत पुरवठा.
बेस्ट प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसरात नियुक्त तसेच जनरेटरचीही व्यवस्था.

मंडपात ‘‘श्रीं’’ च्या दर्शनासाठी प्लाझ्मा टीव्ही व्यवस्था.

सुरक्षेच्या अनुषंगाने बॅगेज स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे, डीएफएमडी, एचएचएमडी व वॉकी-टॉकी ची व्यवस्था

लॅपटॉप व कॅमेरा ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार नाही.

मंदिरापर्यंत येण्या जाण्यासाठी
मेट्रो LINE – 3 (AQUA LINE) सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सदर मेट्रो सेवा उपलब्ध
विनामूल्य बससेवा –
न्यासातर्फे भाविकांना विनामूल्य बससेवा उपलब्ध करुन देण्यासाठी एकूण २० खाजगी वातानुकूलित बस (२० सीटर बस) भाडेतत्वावर उपलब्ध करून देणार.
बस मार्गिका
रविंद्र नाटय मंदिर दादर स्थानक रविंद्र नाटय मंदिर

———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here