Home Uncategorized भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा सांगलीचे १ हजार युवक करणार सैनिकांसाठी...

भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा सांगलीचे १ हजार युवक करणार सैनिकांसाठी रक्तदान सांगलीतून महारक्तदान यात्रेला सुरुवात

94
0

सांगली – शिवसेना सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेला आजपासून सांगलीतून सुरुवात करण्यात आली आहे. येत्या ९ ऑगस्टला ही यात्रा जम्मू-काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयात पोहोचणार असून त्याठिकाणी सांगली जिल्ह्यातले १ हजार तरुण रक्तदान करणार आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली जिल्ह्याला देशसेवेची मोठी परंपरा लाभलेली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती सीमेवर देशसेवा करत आहे. या सैनिकांना मानवंदना म्हणून शिवसेनेच्यावतीनं सिंदूर महारक्तदान यात्रा सुरु करण्यात येणार आहे. देशातल्या एकूण ७९७ जिल्ह्यांपैकी सांगली हा एकमेव जिल्हा असा आहे ज्याने स्वातंत्र्यानंतर अशापद्धतीनं देशभक्तीपर उपक्रम राबविला आहे.

पुढील वर्षभरात सिंदूर महारक्तदान यात्रा निघणार आहे. वायूसेना आणि नौदलाच्या रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. भारतीय सैन्याला आवश्यकता असेल त्या ठिकाणी जाऊन सांगलीकर रक्तदान करतील, असा विश्वास व्यक्त केलाय.

आजपासून (५ ऑगस्ट) सांगली ते जम्मू-काश्मीर असा प्रवास हे रक्तदाते धर्मवीर एक्सप्रेसने करणार आहेत. शिराळा, वाळवा, कडेगाव, पलुस, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सुमारे १ हजार पेक्षा अधिक तरुण या सिंदूर महारक्तदान यात्रेत रक्तदान करणार आहेत. हा आपल्यासाठी अत्यंत गौरवाचा, प्रेरणादायी प्रसंग असून भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा, देशभक्तीने भारावलेला प्रसंग असल्याची भावना व्यक्त केली.

रक्तदानाचे हे कार्य सामाजिक कार्याच्या पलिकडे असून देशभक्ती व्यक्त करण्याचे अद्वितीय उदाहरण सांगली जिल्हा शिवसेनेने श्री. चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.
बळीराजाच्या सन्मानार्थ आणि गौसंवर्धनाच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ‘धर्मवीर एक्सप्रेस’ सांगली ते जम्मू-काश्मीर प्रवासाला सुरुवात झाली आहे.

#udaysamant #ratnagiri #maharashtra #EknathShinde #महारक्तदान #धर्मवीर_एक्सप्रेस #Sangli

Chandrahar Patil – पै.चंद्रहार पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here