केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी हे शनीवारी बेधडक बोलले ! नागपुर मधील ‘सुरेश भट सभागृहा’ त शनिवारी दुपारी एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सरकार ‘ निकम्मी’ असल्याचे सांगत सगळ्यांना धक्का दिला. विदर्भ एडव्हेंचर असोसिएशन, नागपूर च्या वतीने आयोजित ‘स्पोट्स ॲज ओ करियर सेमिनार’ मध्ये नीतीन गडकरी पुढे म्हणाले की, “चांगले दिवस सुरू असले की तोंडावर प्रशंसा करणारे अनेक लोक मिळतात. परंतु हे दिवस निघून गेल्यावर अडचणीच्या काळात कोणीही विचारत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात मेहनत घेऊन प्रत्येकाने चांगले करियर घडवायला हवे. मी फायनान्शियल तज्ज्ञ, लेखापाल नाही. परंतु चांगला फायनान्शिलय समूपदेशक आहे. मी पाच लाख कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते- पुलाचे काम हातात पैसे नसतांनाही करतो.”
नागपुरात मला ३०० स्टेडियम तयार करण्याची इच्छा आहे. परंतु शासकीय यंत्रणेकडून अडचणी येतात. सरकार ही निकम्मी गोष्ट आहे. सरकारच्या अखत्यारित असलेली महापालिका, नागपूर सुधार प्रण्यास वा इतर संस्था काही कामाच्या नाही. या सगळ्या यंत्रणा चालू गाडीला पंक्चर करण्याचे काम करतात. त्यामुळे दुसऱ्या पद्धतीने काम करवून घ्यावे लागते. माझ्याकडे एक दुबईचा माणूस आला. तो तेथे स्टेडियम चालवत होता. त्याला आता नागपुरातील स्टेडियमसाठी कंत्राट काढण्याचे काम दिले. त्यानुसार मैदान, तिथे पाण्यासह इतर सोयी व बांधकाम शासन करेल. परंतु ते उत्तमरित्या चालवणे , त्याच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. त्यासाठी तो इथे विविध खेळासाठी येणाऱ्या तरुणांकडून माफक शुल्क आकारेल. येथे कुणालाही फुकट सोय द्यायला नको. कारण फुकट गोष्टीची कुणालाही किंमत नसते. पैसे देऊन संबंधित व्यक्ती प्राणाणिकपणे मेहनत घेतो”, असेही गडकरी म्हणाले.
त्याच वेळी नीतीन गडकरी यांनी राजकारणावरही टोकदार भाष्य केले. गडकरी म्हणाले,” मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. राजकारण हा फुकटांचा बाजार आहे. राजकारणांकडून फुकटात काय मिळणार? यासाठीच प्रयत्न केले जातात.”
















