Home Uncategorized बेस्ट कामगार सेनेचे ‘बेस्ट बचाव आंदोलन’! वडाळा आगारासमोर चार तास आंदोलन! “..नाहीतर...

बेस्ट कामगार सेनेचे ‘बेस्ट बचाव आंदोलन’! वडाळा आगारासमोर चार तास आंदोलन! “..नाहीतर याहून तीव्र आंदोलन होईल”-सुहास सामंत

68
0

बेस्ट कामगार सेनेच्या वतीने बेस्ट उपक्रमातील विविध समस्यांबाबत तीव्र आंदोलन शुक्रवारी बेस्ट च्या वडाळा आगाराबाहेर करण्यात आले.
दुपारी १ पासून ते सायंकाळी ५ पर्यंत हे आंदोलन सुरु होते.
या आंदोलनात प्रामुख्याने पुढील विषयावर आवाज उठविण्यात आला
● बेस्टला सरकारने दहा हजार कोटीची आर्थिक मदत करावी.
● बेस्टचा स्वमालकीचा बसताफा ३३३७ झालाच पाहिजे .
● सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युईटी त्वरीत देण्यात यावी.
● कामगारांची प्रलंबित थकबाकी प्रदान करा .
● सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रमोशन तात्काळ सुरू करा .
● नवीन नोकरभरती सुरू करा .
तसेच बेस्टमधील लावण्यात आलेल्या अदानी कंपनीच्या नवीन स्मार्ट मीटर विरोधात भूमिका मांडण्यात आली. यावेळी
माजी आमदार दगडू दादा संकपाळ ,आमदार सुनील शिंदे, सुहास सामंत,शिवसेना उपनेते,बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष ,रंजन चौधरी,सरचिटणीस,अनिल कोकिळ,माजी बेस्ट समिती अध्यक्ष,कमलाकर शेनॉय ,ज्येष्ठ समाजसेवक.
निवृत बेस्ट अधिकारी वर्गातर्फे धनंजय पवार या प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सागितले की, “बेस्टची परिस्थिती गंभीर आहे . आणि म्हणुनच पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. विषय मार्गी नव्हे सुटायला हवा अन्यथा याहून तीव्र आंदोलन करू ”

बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष भास्कर तोरसकर,उमेश सारंग,मनोहर जुन्नरे,आदी पदाधिकारी वर्गाने बेस्टच्या आजच्या आंदोलनात मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here