Home Uncategorized कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती...

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे

86
0

ठाणे,दि.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते.

शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

अ) अध्यक्ष- सामाजिक कार्याचा ५ वर्षाचा अनुभव असलेली महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेली माहिला.

ब) दोन सदस्य- महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशा अशासकीय संघटना / संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती, त्यांच्या पैकी किमान एक सदस्य महिला असावी.

1. त्यापैकी कायद्याची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती.

2. तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्प संख्यांक समाजातील महिला.

अर्जदार ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असावा तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अपहार / गुन्हा दाखल नसावा, अर्जदार यांचे अलीकडील काळातील पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र, वैयक्तिक परिचय पत्र व इतर आवश्यक कागदपत्रासह अध्यक्ष व सदस्यांसाठी परिपूर्ण प्रस्ताव दि.२९ जुलै २०२५ रोजी पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नियोजन भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here