सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !*
*नवी दिल्ली:-१६ जानेवारी
२०२५, हा तोच दिवस ज्या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. खर तर आठव्या वेतन आयोगाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती मात्र या नव्या वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पहाट ठरली.*
मोदी सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची बहुचर्चित मागणी पूर्ण केली. अजून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण लवकरच या आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे आणि त्यानंतर मग समितीकडून आपल्या शिफारशी सरकारकडे सादर केल्या जातील.*
सरकारकडे समितीच्या शिफारशी पोहोचल्यात की मग सरकारकडून या शिफारशी स्वीकारल्या जातील आणि प्रत्यक्ष नवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना लागू होणार आहे. खरे तर चौथ्या वेतन आयोगापासून प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे.यानुसार 1 जानेवारी २०२६२०२६ पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत आता आपण पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोग पर्यंत कोणत्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के पगार वाढ मिळाली याचा आढावा घेऊयात.*
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला ?*
पहिला वेतन आयोग१९४८ मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाला आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ४०% ने वाढवला.*
दुसरा वेतन आयोग१९५९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने दुसरा वेतन आयोग लागू केला. दुसऱ्या वेतन आयोगात काँग्रेस सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ५० टक्क्यांनी वाढवण्यात आला.*
तिसरा वेतन आयोग १९७३ मध्ये तिसरा वेतन आयोग लागू झाला. तत्कालीन काँग्रेस सरकारने तिसऱ्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार २५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.*
चौथा वेतन आयोग १९८६ मध्ये चौथा वेतन आयोग लागू झाला. चौथ्या वेतन आयोगातून तत्कालीन काँग्रेस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ४० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.*
पाचवा वेतन आयोग १९९६ मध्ये पाचवा वेतन आयोग लागू झाला. पाचव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३५ टक्क्यांनी वाढला.*
सहावा वेतन आयोग २००६ मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला. सहाव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ४० टक्क्यांनी वाढला.*
सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. एक जानेवारी २०१६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोग लागू आहे. दरम्यान सातव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १४ टक्क्यांनी वाढला. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सगळ्यात कमी वेतन वाढ मिळाली आहे.*


















