Home Uncategorized *कथित हनी ट्रॅप प्रकरणात जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच विधानभवनात भाजप कार्यकर्त्यांकडून राडा*

*कथित हनी ट्रॅप प्रकरणात जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच विधानभवनात भाजप कार्यकर्त्यांकडून राडा*

66
0

मुंबई १८ जुलै : राज्यात झालेल्या कथित हनी ट्रॅप प्रकरणात सरकारचे 70 ते 75 अधिकारी व काही आजी-माजी वरिष्ठ नेते / मंत्री अडकले असल्याचे बोलले जाते.

या प्रकरणाबाबत विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाने मुद्दा उपस्थित केला असताना व त्यावर चर्चा व उत्तर सरकारकडून अपेक्षित असताना जाणून-बुजून भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काल विधान भवन परिसरात हाणामाऱ्या केला असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सरकारवर केला.

हनी ट्रॅप प्रकरणाचे गांभीर्य सरकार ओळखून असून याच्यातील सत्यता कधीच बाहेर येऊ नये ही सरकारी पक्षांची रणनीती आहे.

विधान भवनात काल झालेल्या हाणामारीमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या वैभवशाली संसदीय परंपरेला डाग लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या कडून करण्यात आले आहे.

विधिमंडळ परिसरात अशा प्रकारची हाणामारी करून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीचा अपमान केला असाही आरोप महेश तपासे यांनी केला.

महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली संसदीय परंपरेचे जतन व्हावं अशी अपेक्षा तपासे यांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here