बालरंगुभूमीसाठी
नाटकाचा तास हे ४०रंगमंचीय खेळांचे अभ्यासक्रम स्वरूप पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी महत्वपूर्ण योगदान
इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, विशेषता बालगटासाठी मुलांचे व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसन आणि ललित कला निर्मिती याला सक्षम करण्यासाठी ४० रंगमंचीय खेळांचे पुस्तक देवदत्त प्रकाशन तर्फे गुरुपौर्णिमेला प्रकाशित होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे (स्वाधार रेजजाऊ ऑफ होप)तसंच युवा बाल रंगभूमी अभ्यासक ,मिलिंद केळकर, राहुल फाटक, सीमा जोगदंनकर आणि गुरुस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सदर पुस्तक १० जुलै गुरुवार सायंकाळी सहा वाजता गुरुस्कूल पुणे शनिवार पेठ येथे होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नाट्य कलेचा अंतर्भाव झाल्यानंतर या संदर्भातल्या अनेक तज्ञ लोकांचा जो चर्चा सुसंवाद आपल्या मोटिवेशन प्रेरित पेपर मधून झाला त्यातूनच हा एक चांगला मार्ग पुढे आला आहे. बालगटासाठी रंगमंचीयखेळातून मुलांचे मन बुद्धी आणि शरीर हे सकारात्मक विचाराने घडावे, यासाठी रंगभूमी कलेतील रंगमंच खेळ हे साधन अतिशय रंजक, प्रबोधक, पद्धतीने वापरत मुलांना विकसित करण्यासाठी हे नाटकाचे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे ,असे नाटकाचा तास चे लेखक प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले आहे.
Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा “बालरंगभूमीसाठी नाटकाचा तास” हे ४०रंगमंचीय खेळांचे अभ्यासक्रम स्वरूप पुस्तकाचे प्रकाशन





















