Home Uncategorized ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना बेघर होऊ देणार नाही*- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना बेघर होऊ देणार नाही*- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

100
0

मुंबई :- ज्येष्ठ मराठी सिनेकलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. “आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झाले तरीही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही !”अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महिमकर यांना दिली .

मनमोहन महिमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि इतर अनेक सिनेमामध्ये काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कामे मिळेनाशी झाली होती. त्यातच गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना
कोरोना काळादरम्यान इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला. मात्र हे कळताच त्यांच्याच नातेवाईकांनी या घरावर दावा सांगितला. या वादामुळे त्यांना विकासकाकडून मिळणारे भाडेही बंद झाले. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या माहिमकर यांनी व्यथित होऊन त्यांनी राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केला होता.
याबाबत विविध माध्यमातून बातम्या आल्यानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी येथील बंगल्यावर त्यांनी महिमकर यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहिमकर यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर घर माहीमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले. तसेच “आम्ही आपल्यासोबत असून काहीही करून तुम्हाला बेघर होऊ देणार नाही’ असेही सांगितले.
शिंदे यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले तसेच आपले म्हणणे ऐकून तत्काळ आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मनमोहन माहिमकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांचे आभार मानले.
‘ मराठी कलाकारांच्या मदतीला उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच तत्पर असतात. मनमोहन महिमकर यांच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे असे” मत शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार यांनी व्यक्त केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here