*राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन*
*”सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
मुंबई | २६ जून २०२५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या शिल्पाला पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान भवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच विधानभवन सचिव जितेंद्र भोळे (कार्यभार-१), सचिव मेघना तळेकर (कार्यभार-२) आणि सचिव शिवदर्शन साठ्ये (कार्यभार-४) उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्याय, शिक्षण हक्क, आणि समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षणाची दारे खुली केली आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी मूलभूत कार्य केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेणे, ही आजच्या दिवसाची खरी जयंती आहे.”
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करत सामाजिक समतेच्या दिशेने सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.े



















