Home Uncategorized *दिविजा वृद्धाश्रम मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

*दिविजा वृद्धाश्रम मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

235
0

तळेरे, दि. २५ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून कणकवली व देवगड तालुक्यातील हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी ग्रामीण भागातील २९ शाळेतील हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून आपल्या शालेय नातवंडाना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्याचा आगळा कार्यक्रम केला

आजी आजोबांनी आपली नातवंडे शिकताना त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी या उद्देशाने त्यांना या भेट वस्तू दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना या भेटी सोबत आजी आजोबांनी भरभरून आशीर्वाद देण्यात आले. या भेटवस्तूमध्ये शालेय दप्तर, लॉंग बुक, एकेरी वही, चौखडी वही, चौरेघी वही, अंकलपी, कंपास बॉक्स, रंग खडू, पेन, पेन्सिल पट्टी कीट आदी वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्यात.

काही प्राथमिक शाळांना कॅरम भेट देण्यात आले तर इंग्लिश मिडीयम स्कूल फोंडा शाळेतील शिक्षक दत्तगुरू चव्हाण यांनी राबवलेल्या वाचनालय उपक्रमात आजी आजोबांनी वाचलेली १०० पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या उपक्रमात मोफत भेट देण्यात आली.

दिविजा वृद्धाश्रम मार्फत शाळा नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली, जि.प.प्राथमिक उर्दू शाळा नांदगाव, खा.प.शाळा असलदे तावडेवाडी, जि.प.प्राथमिक शाळा बिडवाडी कणखरे, जि.प.प्राथमिक शाळा कळसुली नं १, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.१, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.३, जि.प.केंद्रशाळा नांदगाव नं.१, जि.प.शाळा तोंडवली गावठण, जि.प.पू.प्राथमिक शाळा तोंडवली नं.१, जि.प. प्राथमिक शाळा असलदे नं.१, जि.प.प्राथमिक शाळा असलदे गावठण, माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड, जि.प.प्राथमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड, जि.प.प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी, जि.प.प्राथमिक शिक्षण शाळा आयनल मणेरवाडी, जि.प.प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी, जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव राकसवाडी, जि.प.शाळा साळशी नं.१, जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव आंबेखोल, जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव निमतवाडी, जि.प.पूर्ण.प्राथमिक शाळा शिरगाव-चौकेवाडी, जि.प.केंद्रशाळा शिरगाव नं.१, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा महाळुंगे-राणेवाडी, जि.प.पूर्ण.प्राथमिक शाळा तोरसोळे नं१, जि.प.प्राथमिक शिक्षण शाळा वळीवंडे नं.१, जि.प.प्राथमिक शाळा ओंबळ गावठण बौद्धवाडी इ. शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

छायाचित्र : 0048
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून कणकवली आणि देवगड तालुक्यातील विविध शाळेतील हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here