मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया(माई) च्या अध्यक्ष श्रीमती शीतल हरीष करदेकर आणि कोषाध्यक्ष व मुंबई अध्यक्ष, चेतन काशीकर , मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह दिपक भातुसे कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड माजी कार्यवाह प्रविण पूरो ज्येष्ठ सदस्य विलास मुकादम यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारितेचा ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड ‘मंत्रालयातील पत्रकार कक्षात मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत वरिष्ठ पत्रकार किशोर आपटे यांना प्रदान करण्यात आला.
![]()
नुकत्याच भव्य व देखण्या स्वरूपात संपन्न झालेल्या माई मीडिया२४ प्रस्तुत, प्लँनेट मराठीच्या सहकार्याने झालेल्या ‘मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५’या सोहळ्याला किशोर आपटे उपस्थित राहू शकले नव्हते ,म्हणून त्यांच्या कार्यक्षेत्री प्रदान करण्यात आला.
वरिष्ठ पत्रकार किशोर आपटे,
मागील सत्तावीस वर्षाहून अधिक काळ राजकीय पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. राज्य अधिस्विकृती
पत्रिकाधारक स्वतंत्र व्यवसायी पत्रकार असून विधिमंडळ आणि मंत्रालयाच्या वार्तांकनाचा प्रदीर्घ अनुभव.
राजकीय लेख, बातम्या, वार्तापत्र, संहिता, समालोचन, तसेच अनेक नियतकालिकांसाठी सातत्याने वैविध्यपूर्ण लिखाण. आकाशवाणी, दूरदर्शनसाठी
विधिमंडळ समालोचन संहिता लेखन, दूरदर्शनच्या जनादेश २००४, २००९कार्यक्रमांसाठी लेखन.
अनेक दूरचित्रवाणीच्या राजकीय चर्चामध्ये सहभाग. सोशल मीडियामध्ये विश्लेषक पॅनलचर्चामध्ये सहभाग.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ‘हमारी धरोहर हमारा वैभव’ माहितीपटासाठी हिंदीसंहिता लेखन, दिग्दर्शन, निर्माता.
अनेक राजकीय, सामाजिक माहितीपटांसाठी लेखन, दिग्दर्शन संपादनाचा अनुभव.
दै. लोकसत्ता (अंतरंग), दै. नवाकाळ, दै. नवशक्ति, दै. सामना, दै. जनमाध्यम, दै. देशदूत, दै. सार्वमत,
.दै. सागर, दै. देशोन्नती, दै. बित्तंबातमी, दै. पुण्यनगरी, सा. बळवंत, सा. लोकवाहिनीसह महाराष्ट्रातील २५ पेक्षा
जास्त नियतकालिके, वृत्तपत्रांसाठी बातम्या, विशेष लेख प्रकाशित. अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकासाठी
विशेष लेख प्रकाशित. भ्रष्टाचार (सन २०००) या आमोद प्रकाशनाच्या पुस्तकाचे लेखक. सामाजिक, राजकीय
स्थित्यंतराचे साक्षीदार, भाष्यकार.
विधान परिषद शतकहोत्सवानिमित्त , महामहिम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रकाशित “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्त्व ” या ग्रंथाचे एक संपादक !
केवळ बातमीदारी पेक्षा आपल्या माध्यमातून अनेकांना सहकार्य करण्याचे काम केले आणि म्हणूनच या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.























