Home Uncategorized *परिवहन महामंडळाच्या जागांच्या ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा* *परिवहन मंत्री...

*परिवहन महामंडळाच्या जागांच्या ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा* *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*

102
0

मुंबई, दि. 6: राज्य परिवहन महामंडळाच्या शहरांमध्ये बसस्थानक, बस आगार परीसरात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिल्या.

एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस महामंडळाचे महाव्यवस्थापक (स्थापत्य) श्री.दिनेश महाजन, वास्तुविषारद श्री. लहीवाल आदी उपस्थित होते.

एसटी च्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्याचे सांगत परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, या जागांच्या विकासासाठी अ, ब व क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. ज्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यात 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानक, आगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामाबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. या कामाला गती देवून तातडीने कार्यवाही पूर्ण करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here