Home Uncategorized *बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्रे दिनांक २८ ते ३० मार्च २०२५ दरम्‍यान...

*बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्रे दिनांक २८ ते ३० मार्च २०२५ दरम्‍यान सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार*

71
0

*सोमवार, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते मध्‍यरात्री १२ पर्यंत मालमत्‍ताकर भरण्‍याची सुविधा उपलब्‍ध*

• *सर्व २४ प्रशासकीय विभागांसह नवीन नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील मालमत्ता कर भरण्‍याची सुविधा*

आर्थिक वर्ष २०२४-२५ चा मालमत्ता कर भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे साप्‍ताहिक व सार्वजनिक सुटीच्‍या दिवशीदेखील कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५ ते रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून तर रात्री १० वाजेपर्यंत आणि सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र राहणार आहेत. नागरिकांनी सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

दिनांक ३१ मार्च २०२५ हा विद्यमान आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी आपल्या मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये येत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शनिवार, दिनांक २९ मार्च २०२५ आणि रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी साप्‍ताहिक सुटी आहे. तर, सोमवार, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी ‘रमजान ईद’निमित्‍त सार्वजनिक सुटी आहे. या कालावधीत मालमत्ता करभरणा करण्यासाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि निर्धारित वेळेत करभरणा व्हावा, यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने घेण्यात आला आहे.

मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. मुंबईकर नागरिक घरबसल्यादेखील मालमत्ता कर भरणा करू शकतात. एनईएफटी, आरटीजीएस, गुगल पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारे नागरिक कर भरणा करू शकतात.तसेच, सिटी बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचा पेमेंट गेटवे निवडू शकतात. नागरिकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरून बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here