Home मुंबई *बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी एकजुटीने लोकशाही मार्गाने आंदोलन करूया—-...

*बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी एकजुटीने लोकशाही मार्गाने आंदोलन करूया—- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन*

336
0

मुंबई दि.१६ –
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे.महाबोधी टेंपल कायदा १९४९ मध्ये
सुधारणा करून महाबोधी महाविहार चे सर्व ८ ट्रस्टी बौद्ध असावेत असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे.येत्या २९ मार्च ला बिहार चे मुख्यमंत्री आणि बिहार चे राज्यपाल यांना आपण भेटणार असून महाबोधी टेम्पल एक्ट १९४९ मध्ये सुधारणा करून सर्व ट्रस्टी बौद्ध असावेत असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी प्रयत्नपूर्वक बिहार राज्य सरकार ला निर्णय घेण्यास भाग पाडू.त्यासाठी देशभरातील बौद्धांनी एकजुटीने लोकशाही मार्गाने आपआपल्या भागात आंदोलन करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here