Home Uncategorized *परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक गुजरात दौऱ्यावर..* *तेथील बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार..!*

*परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक गुजरात दौऱ्यावर..* *तेथील बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार..!*

104
0

मुंबई (१५ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक हे १७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जात असून तेथे ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विवेक भीमनवार, श्री.नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व श्री . नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) श्री . दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम)हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत. *या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री श्री . हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक होणार असून दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.*

सन्माननीय पंतप्रधान श्री. ‌नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली असून इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का! याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे.

चौकट
*वडोदरा येथील पॉड टॅक्सी चाचणी आणि प्रयोग केंद्राला भेट.*

* या दौऱ्यात गुजरात राज्यातील वडोदरा येथील पॉड टॅक्सी चाचणी आणि प्रयोग केंद्राला भेट दिली जाणार आहे. त्याचा देखील अभ्यास करून भविष्यात अशा प्रकारचा प्रकल्प मीरा-भाईंदर शहरांमध्ये राबवणे शक्य आहे का? याची देखील पाहणी यावेळी मंत्री सरनाईक आणि त्यांच्या सोबतचे शिष्टमंडळ करणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here