Home Uncategorized विश्व मराठी संमेलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

विश्व मराठी संमेलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

94
0

पुणे, दि. ३१: विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, भविष्यात महिला कल्याण, धोरणात्मक अंमलबजावणी आणि सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, झोपडपट्टी सेना शहरप्रमुख राजू विटकर, पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, पुणे शहर सहसंपर्कप्रमुख सुदर्शन त्रिगुणाईत, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी आणि पुणे उपशहर प्रमुख सुरेखा कदम-पाटील उपस्थित होत्या.

ही भेट राज्यातील समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here