Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर जागतिक महिला दिनानिमित्त शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये परिसंवाद संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये परिसंवाद संपन्न

195
0

कोल्हापूर / शेखर घोंगडे

जागतिक महिला दिनानिमित्त शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये परिसंवाद संपन्न

*जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा*

*-विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांनी दिला शालेय विद्यार्थ्यांना कानमंत्र*

कोल्हापूर, : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय विद्यार्थी दशेतच मोठं ध्येय बाळगा. ध्येयपूर्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवा. अवांतर वाचनाची गोडी निर्माण करा. मोबाईलचे व्यसन टाळा. गुगल, सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी करा, आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून खडतर परिश्रम केल्यास हमखास यश प्राप्ती होत असल्याचा कानमंत्र विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी दिला.

जागतिक महिला दिनानिमित्त शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे, मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, राज्य कर विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीद, माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुण्याच्या पोलीस उपनिरीक्षक (सीआयडी) दीपाली अतकरे – पाटील, चिपळूणच्या एएचए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या तथा आकार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी कार्वेकर – ओतारी, मीरा डे केअरच्या संचालिका चित्रा भोई – सुपेकर, फॅशन डिझायनर विशाखा वसंत चिले, आदी मान्यवर उपस्थित होते.

     “शाळेत शिकत असताना पाचवी मध्ये गणितात नापास झाले होते, पण तरीही खचून न जाता मी अभ्यास केला आणि जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाले. परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता झोकून देऊन अभ्यास करा, असा सल्ला जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशीद यांनी व्यक्त केला.

आईवडीलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीमुळेच माझ्यासह दोन्ही भाऊ आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असल्याचा अभिमान व्यक्त करुन माहिती अधिकारी वृषाली पाटील म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम, अवांतर वाचन करा. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींची माहिती आणि अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी करा. विद्यार्थ्यांनीही आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले स्वप्न साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यास हमखास यशप्राप्ती होते, असा विश्वास श्रीमती पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here