*पीठासीन अधिकाऱ्यांच्या (AIPOC) ८५व्या अखिल भारतीय परिषदेनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या बिहार दौऱ्यावर*

आज बिहारचे माननीय राज्यपाल आरिफ मोहम्मद खानजी, मुख्यमंत्री ना. नितीश कुमारजी, लोकसभा अध्यक्ष ना. ओम बिर्लाजी, राज्यसभा उपसभापती ना. हरिवंश, बिहार विधानसभा अध्यक्ष ना.किशोर यादव, बिहार विधानपरिषद सभापती ना.अवधेश सिंह यांची राजभवन येथे शिष्टाचार भेट घेतली. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती ना.प्रा.राम शिंदे उपस्थित होते. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली. तसेच, यावेळी त्यांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


















