*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सूचना*
*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी*
*किल्ले रायगडाला भेट देत केली विकास कामांची पाहणी*
रायगड – किल्ले रायगडावर विविध विकासकामे सुरू असून या विकासकामांना गती मिळण्यासाठी कच्चा माल गडावर नेण्यासाठी एअर लिफ्टिंगचा वापर करावा, अशी सूचना आज किल्ले रायगड भेटीवर असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी रायगड विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे आज भेट देऊन अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दर्शन घेतले.
रायगड विकास प्राधिकरणाची आढावा बैठक घेऊन किल्ले रायगडावर सुरू असलेल्या विकास, संवर्धन व संरक्षण कामांची पाहणी केली. किल्ले रायगड मराठा साम्राज्याची राजधानी असल्याने संपुर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. किल्ले रायगडाशी हिंदवी स्वराज्याशी संबंधित जाज्वल्य इतिहास जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाला अनुसरून किल्यावर सुनियोजित विकासात्मक कामे करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विकासकामे जलदगतीने होण्यासाठी नौदलाशी बोलून कच्चा माल गडावर एअर लिफ्टिंग करण्याची आवश्यकता असून याबाबत मुख्यमंत्री यांना सूचना करणार असल्याचे ही त्यांनी म्हटले.
रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत होत असलेल्या कामाची पाहणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरातत्व वास्तू संग्रहालयाची, राज्याभिषेक राजदराबाराची पाहणी यावेळी दानवे यांनी केली.
याप्रसंगी कार्यकरी अभियंता सलोनी निकम, प्रांत अधिकारी ज्ञानेबा बनापुरे,तहसिदार महेश शितोळे, रायगड विकास प्राधिकरण आर. डीए. वरुण भामरे, शिवसेना दक्षिण रायगड संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हाप्रमुख नंदूशेठ शिर्के, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप,उपजिल्हाप्रमख पद्माकर मोरे, विधानसभा प्रमुख अमित मोरे, विधानसभा संघटक धनंजय देशमुख,सुभाष मोरे,आशिष पळसकर, स्विटी गिरासी, सारिका पालकर व निलेश धुमाळ उपस्थित होते.

















