Home Uncategorized अमृता विद्यालयाचा वार्षिक दिन समारंभ भव्यतेने साजरा

अमृता विद्यालयाचा वार्षिक दिन समारंभ भव्यतेने साजरा

168
0

अमृता विद्यालय, नवी मुंबई चा वार्षिक दिन समारंभ नुकताच भव्यतेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय व्ही. देशमुख, मुम्बई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु, पू. स्वामी अव्ययामृतानंद पुरीजी, माता अमृता निधी मठाचे प्रमुख, आणि शाळेच्या प्रशासिका ब्र. शरण्यमृता चैतन्य उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. त्यानंतर शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन शाळेच्या प्रशासिकेने केले, ज्यात शालेय यशाची समीक्षा केली. डॉ. संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रेरित केले, तर स्वामी अव्ययामृतानंद पुरीजी यांनी आध्यात्मिक वृद्धीचे महत्त्व स्पष्ट केले.

“अमृता निधी,” शाळेच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर शालेय कर्तृत्वावर आधारित विद्यार्थ्यांना पारितोषिके, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

समारंभाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात “नवरस,” नऊ भावनांचा भावपूर्ण नृत्यदर्शन सादर करण्यात आला, ज्यात इ. १ ते १२ वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने आणि शांती मंत्राने झाली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here