Home मुख्य बातम्या कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद...

कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती*

208
0

कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ!

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती*

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे.

“मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की…” असे म्हणत  कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज (शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४) शपथ घेतली. याआधी २०१४ सालीदेखील त्यांनी हंगामी अध्यक्षपद भुषविले होते.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही कालिदास कोळंबकर यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर या खास प्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ , विलास आठवले आदि उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली.

विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवार ७ डिसेंबर २०२४ पासून बोलवण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here