मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात *दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान*
मुंबई, दि. २० नोव्हेंबर, २०२४ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. *मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झाले आहे.*
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०३.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-
*मतदारसंघ* *मतदान (अंदाजे)*
१७८-धारावी – ३५.५३ टक्के
१७९सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के
१८०- वडाळा – ४२.५१ टक्के
१८१- माहिम – ४५.५६ टक्के
१८२-वरळी – ३९.११ टक्के
१८३-शिवडी – ४१.७६ टक्के
१८४-भायखळा – ४०.२७ टक्के
१८५- मलबार हिल – ४२.५५ टक्के
१८६- मुंबादेवी – ३६.९४ टक्के
१८७- कुलाबा – ३३.४४ टक्के
###



















