Home Uncategorized मोठया प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार...

मोठया प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

160
0

मुंबई

माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश बळीराम सावंत यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज दादरच्या अँटोनिओ दा सिल्वा हायस्कूल येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री सिद्धिविनायक, दादर माहिम परिसरातील जागृत देवस्थान व शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला व माँ साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आशीर्वाद घेतला.
माहिम येथील शाखा क्रमांक 191 येथून ढोलताशांच्या गजरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत महेश सावंत यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली. रॅली मार्गक्रमण होत असलेल्या
परिसरातील नागरिकांनी जागोजागी त्यांचे जंगी स्वागत केले. इमारतीच्या गॅलरीतून अनेक नागरिकांनी हात उंचावून महेश सावंत यांना प्रतिसाद दिला. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी रॅलीत मोठया प्रमाणात शिवसैनिकांमध्ये व नागरिकांमध्ये उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दिवाकर रावते, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते व माजी महापौर मिलिंद वैद्य, माजी महापौर महादेव देवळे,
काँग्रेस नेते राजन भोसले, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, परिसरातील शाखाप्रमुख,पदाधिकारी व मोठया प्रमाणात शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असल्यामुळे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे गेलो आहे, त्यामुळे समोर कोण प्रतिस्पर्धी उमेदवार आहे, याच आव्हान मी मानत नाही, अशा शब्दांत महेश सावंत यांनी नाव न घेता पत्रकारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या आव्हानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here