Home Uncategorized मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेत दिवाळी अंकांचे उद्घाटन

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेत दिवाळी अंकांचे उद्घाटन

112
0

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेत दिवाळी अंकांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे २५ जणांनी हजेरी लावली. दिवाळी अंक योजनेसाठी आत्तापर्यंत ७० सभासदांनी नोंदणी केली आहे व अजूनही दिवाळी अंक वाचण्यासाठी सभासद वृद्धीगत होतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमास संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री.रवींद्र गावडे कोषाध्यक्ष श्री.जयवंत गोलतकर नायगाव शाखेचे कार्यवाह श्री. अमेय कोंडविलकर हे उपस्थित होते. सभासदांना अंक वितरित करून अल्पोहार देऊन सभासदांचे स्वागत करण्यात आले. श्री रवींद्र गावडे यांनी नायगाव शाखेचे सदस्य म्हणून सभासदांशी संवाद साधला तसेच सभासदांचे प्रश्न सोडवण्याचा दृष्टीने शाखा समिती कटिबद्ध आहे अस आश्वासन दिले.

सभासदांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व अजूनही दिवाळी अंक योजनेसाठी सभासद भरभरून प्रतिसाद देत आहेत.

आपला कार्यवाह
श्री.अमेय कोंडविलकर
श्री.मकरंद केसरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here