सन २०२४ पर्यन्त माजी मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी बेस्टच्या सर्व कर्मचारी वर्गास कोरोना काळात केलेल्या उकृष्ट कामगिरी बद्दल रू.२००००/- ईतका दिवाळी बोनस तीन वर्षांपर्यंत देऊन बेस्टच्या कर्मचारी वर्गाचा मान राखला होता.त्यानंतर वेळोवेळी महापालिका प्रमाणे बेस्ट कर्मचारी वर्गास दिवाळी बोनस वाढवून देण्यात येत होता.यावर्षी देखील आम्ही आचार संहिता लागण्याच्या अगोदरच मुंबई महापालिका आयुक्त श्री भूषण गगराणी साहेब, व बेस्टचे महाव्यवस्थापक श्री अनिल डिग्गीकर साहेब यांना दिवाळी बोनस दिवाळी पूर्वी देऊन बेस्टच्या कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड करावी अशी लेखी पत्राद्वारे,महाव्यवस्थापक यांना भेटुन मागणी केली होती,आणि महापालिका कर्मचारी वर्गांनुसर बेस्टच्या कर्मचारी वर्गास दिवाळी बोनस देण्याचे मान्यही केले असताना,सर्वांना दिवाळी बोनस भेटला मग बेस्ट कर्मचारी वर्गाचा दिवाळी बोनस का अडवून ठेवला आहे.का ह्यामध्ये कोणी राजकारण करीत आहे,किंवा महापालिका आयुक्त कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत हे बघावे लागेल.
ॲड.श्री.उदय कुमार आमोणकर
कार्याध्यक्ष
बेस्ट कामगार सेना

















