Home मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सना मलिक – शेख या २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सना मलिक – शेख या २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

137
0

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक – शेख हिच्यासाठी सोडला आहे. नवाब मलिक यांनी बांधलेला हा अभेद्य गड पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी सना मलिक – शेख या गेली पाच वर्षे काम करत आहेत. त्यामुळेच पक्षाने सना मलिक – शेख यांच्यावर विश्वास दाखवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

सना मलिक – शेख या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात काम करत आहेत. आता अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक – शेख या आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here