Home उद्योग / शिक्षण वार्ता टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला -आदित्य ठाकरे

टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला -आदित्य ठाकरे

199
0

महाराष्ट्रातल्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम भाजपा करतंय
– आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मा. आमदार आदित्याजी ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मिदे महायुतीवर हल्लाबोल केलाय.राज्यातील धन आपली लक्ष्मी गुजरातला भाजप घेऊन जात आहे.टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रतून गेला, वेदांता फोक्सकॉन सुद्धा गेला.महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

एअरबस टाटा चा प्रकल्प मिहान ला नागपूरला येणार होता.
पण तो गुजरातला गेला भाजपन चांगला प्रकल्प महाराष्ट्राला दिला नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
निवडणुकीच्या तोंडावर काल गुजरात मध्ये रोड शो मोदीकडून करण्यात आला.. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम कालच्या रोड शो ने केलं…

देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील आणि नागपूर मधील प्रकल्प जात असल्याच वाईट वाटत नाहीं का असा सवाल करत.आदित्य ठाकरें यांनी नागपूर मध्ये परिवर्तन नकीच होईल असा दावा केलाय.नागपूरकराना माहिती आहे की रोजगार नागपूर मधून गेलाय. .

मुंबईच्या जीवन वाहिनीला आमचं सरकार आल्यावर वैभव देणार – आदित्य ठाकरे

बेस्ट बस सेवा ही उत्तम सेवा आहे, ३३३७ बसेस चालवणे गरजेचं होतं.अजूनही मुंबईत ३३ ते ३५ लाख प्रवासी बस ने प्रवास करतात.पण या सरकारने या बसेस कमी करून अडीच हजार वर आणल्या आहेत.जर हे सरकार असाच राहील तर या बसेस फक्त अडीचशे वर आणतील

आम्हाला १०००० बसेस आणायच्या होत्या, ९०० इलेक्ट्रिक बसेस आणायच्या होत्या.हे आम्ही बदलणार आहोत
सणसुधीला या बसेस तुम्ही कमी करत आहात.

एकनाथ शिंदे आणि भाजपची दृष्ट नजर महाराष्ट्रवर आहे .आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ हे सगळे मुद्दे समोर आणू .फुकटात तुम्ही सगळं टॅक्स अदानीला देणार का?

सगळ्या युवाच्या जखमेला तुम्ही मीठ चोळण्याचा काम करत आहात आता त्यांच्या उमेदवारांनी यावर बोलाव असं ही आदित्य ठाकरेनी पत्रकार परिषदेत मांडल.मुंबई लुटण्याचा काम शिंदे आणि भाजप करत आहेत

कुटूंबप्रमुख म्हणून सगळ्यांना उद्धव ठाकरे यांना जपलं आता श्रीनिवास वणगा यांना २ वर्षानंतर कळलं असेल… ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here