Home मुंबई *भाजपने राज ठाकरेंची स्क्रिप्ट लिहिली असावी महेश तपासे यांचा हल्लाबोल..*

*भाजपने राज ठाकरेंची स्क्रिप्ट लिहिली असावी महेश तपासे यांचा हल्लाबोल..*

126
0

*राज ठाकरे कडून शरद पवारांना जातीवादी ठरवण्याचा प्रयत्न..*

*भाजपने त्यांची स्क्रिप्ट लिहिली असावी महेश तपासे यांचा हल्लाबोल..*

शरद पवारांना जातीवादी ठरवण्याची सुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपकडून घेतली का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना विचारला.

पक्ष स्थापन करून इतके वर्ष झाले तरी देखील निवडणुकीच्या राजकारणात यश मिळत नाही यामुळे राज ठाकरे हताश झाले आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांना जन माणसाच्या सेवेचा ठोस कार्यक्रम त्यांना येत नाही त्यामुळे फक्त टीकाटिपणी व मिमिक्री करण्यातच ते वेळ घालवतात असे महाराष्ट्राचे मत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण वेगाने वाढू लागलं हे राज ठाकरेंचं वक्तव्य अतिशय हास्यस्पद आहे. प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका बदलत असते व त्यामुळे लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत” असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here