Home मुंबई मुंबईत आता AI ठेवणार स्वच्छतेवर लक्ष! कचरा टाकताच ‘एआय कॅमेरा’ देणार इशारा

मुंबईत आता AI ठेवणार स्वच्छतेवर लक्ष! कचरा टाकताच ‘एआय कॅमेरा’ देणार इशारा

8
0

मुंबईत आता AI ठेवणार स्वच्छतेवर लक्ष! कचरा टाकताच ‘एआय कॅमेरा’ देणार इशारा

*मुंबई, दि. २९ ऑक्टोबर :*

बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या दिशेने एक अभिनव पाऊल उचलले आहे. आता कचरा टाकणाऱ्यांना थेट कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) समजावणार आहे.

महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने माहीम येथील गजानन वाटीका परिसरात प्रायोगिक तत्वावर AI कॅमेरा बसवला आहे. ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो (Garbage Vulnerable Points – GVPs), अशा ठिकाणी हा कॅमेरा लावण्यात आला आहे.

*कसे काम करते ही यंत्रणा?*
कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल AI कॅमेऱ्यात टिपली जाते आणि लगेच त्याला जोडलेल्या ध्वनीक्षेपकाद्वारे (Speaker) “परिसर स्वच्छ ठेवा, उघड्यावर कचरा टाकू नका” असा स्वच्छतेचा संदेश दिला जातो.

यामुळे कचरा टाकणारी व्यक्ती परावृत्त होते आणि परिसरात अस्वच्छता होत नाही.

*कोणाच्या मार्गदर्शनाखाली?*
महानगरपालिका आयुक्त *श्रीमती अश्विनी भिडे* यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त *डॉ. विपिन शर्मा*, उप आयुक्त *श्री. किरण दिघावकर*, परिमंडळ-२ चे उप आयुक्त *श्री. प्रशांत सपकाळे* आणि सहायक आयुक्त (जी उत्तर) *श्री. योगेश देसाई* यांच्या पुढाकाराने हा प्रयोग राबवला जात आहे.

या प्रयोगाच्या यशाचा आढावा घेऊन लवकरच मुंबईतील इतर GVP ठिकाणीही ही AI यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

*MAI MEDIA 24 चे आवाहन:* नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये आणि मुंबई स्वच्छ ठेवण्यात BMC ला सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here