*MAI MEDIA 24 | ब्रेकिंग*
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मालेगावात मोठी कारवाई; महानगरपालिका आयुक्तांसह तिघे ८० हजारांची लाच घेताना ताब्यात
*नाशिक/मालेगाव, दि. २९ ऑक्टोबर २०२६ :*
मालेगाव महानगरपालिकेच्या प्राधिकरणात ठेकेदाराच्या बिलांमधून ४% टक्के प्रमाणे लाच मागणाऱ्या आयुक्तांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नाशिक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
*तक्रार काय होती?*
मूळ तक्रारदार (वय ४८) यांनी दि. ०७/१०/२०२६ रोजी तक्रार दिली होती की, महानगरपालिका मालेगावकडील प्राधिकरणात दिलेल्या दोन ठेकेदारांपैकी अश्विनी महानगरपालिका मालेगाव मार्फत केलेल्या कामाचे दोन बिले व ठेकेदार यांचे बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येणाऱ्या रकमेतून ४% टक्के प्रमाणे ८०,०००/- रुपयांची लाच मागितली जात आहे.
तक्रारीच्या पडताळणीनंतर दि. १३/१०/२०२६ रोजी व दिनांक २३/१०/२०२६ रोजी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. स्वीय सहाय्यकाने २ कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ४ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली, तर आरोपींनी तडजोडीनंतर ८०,०००/- रुपयांवर लाच घेण्याचे मान्य केले.
*कारवाई:*
दि. २९/१०/२०२६ रोजी सापळा रचण्यात आला. आरोपी लोकसेवक रविंद्र जाधव, आयुक्त यांनी तक्रारदाराकडे ४ कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी ४ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली आणि आपल्या स्वीय सहाय्यक निलेश पाटील व अकाउंटंट हरेश डिंबर यांच्या मार्फत लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
*आरोपी :*
१) *रविंद्र शेरराव जाधव* – आयुक्त, महानगरपालिका मालेगाव, जि. नाशिक
२) *निलेश वसंतराव पाटील* – स्वीय सहाय्यक, आयुक्त
३) *हरेश नथुराम डिंबर* – अकाउंटंट, मनपा मालेगाव
या तिघांना दि. २९/१०/२०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याविरुद्ध मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे गु.र.नं. १८८/२०२६ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सापळा अधिकारी :* श्रीमती स्वाती पवार, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*मार्गदर्शन :* श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, श्री. प्रदीप मेरगळे व श्रीमती कविता फडताडे, अपर पोलीस अधीक्षक.
> लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा.
> *संपर्क :* http://acbmaharashtra.gov.in / टोल फ्री – १०६४
*संपादक: प्रो शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*
*वृत्त : जे सत्य सांगते; सद् रक्षणाय, खल दमनाय.*
—
























