*महापारेषणमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा*
*कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा*
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये (महापारेषण) दक्षता जनजागृती सप्ताह राज्यभर साजरा करण्यात आला. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार (भा.प्र.से.) यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली.
प्रतिज्ञेनंतर मा. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा संदेश अनुक्रमे संचालक (प्रकल्प) श्री. दत्तात्रय पडळकर आणि मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे यांनी उपस्थितांना वाचून दाखवला. सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभर जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. दत्तात्रय पडळकर, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक (संचलन) श्री. पीयूष शर्मा, कार्यकारी संचालक (प्रकल्प) श्री. सुनील सूर्यवंशी, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, मुख्य अभियंता श्रीमती शिल्पा कुंभार, श्री. किशोर गरूड, श्री. अमित नाईक, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.नितीन कांबळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती सीमा डुबेवार, अधीक्षक अभियंता श्री. संजीवकुमार बद्देला, श्री. भूषण साळुंखे, उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. प्रशांत गोरडे, श्री. किशोर पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह` आयोजित करण्यात येतो. यावर्षी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी समृध्दीसाठी सत्यनिष्ठा` ही संकल्पना घेऊन हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.
























