*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शेतकऱ्यांना घोषणांची नाही, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे!*
शंकर आबनराव क्षीरसागर, वय ४५ वर्षे… रा. बोरगाव तेलंग, जि. नांदेड. दोन मुली, एक मुलगा आणि उदरनिर्वाहासाठी शेती हाच एकमेव आधार! मात्र, आज याच शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. तीन वेळा कर्जमाफी झाल्याचे सांगितले जात असताना, एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची व्यथा त्यांना मांडावी लागत आहे. शेतीला पाणी नाही, आर्थिक संकटाने कुटुंबाची घडी विस्कटली आहे आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचा खर्च भागवणेही कठीण झाले आहे.
आत्महत्येपूर्वीची निराशा व्यक्त करताना हा शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहे. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या या बळीराजाच्या शब्दांतून त्याची असहायता आणि भविष्याबद्दलची चिंता स्पष्टपणे जाणवते. शेतकऱ्याला जगण्याचा मार्ग दिसू नये आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता करताना आत्महत्येचा विचार करावा लागावा, ही राज्याच्या कृषी व्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर बाब आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शेतकऱ्यांच्या वाट्याला आश्वासने आणि निराशाच येणार असेल, तर त्यांच्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार? कर्जमाफीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यातील दरी कधी भरून निघणार?
सरकारने आता तरी जागे व्हा! शेतकऱ्यांच्या निराशेचे रूपांतर आशेत करण्यासाठी घोषणांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष मदत द्या!
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@bharanemamaNCP
#farmercrisis #farmerslife #maharashtradrought






















