*रत्नागिरी : आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावरील कारवाईवर पालकमंत्री उदय सामंत नाराज*
*”माझ्या मतदारसंघात कारवाई करण्यापूर्वी मला माहिती द्या” – वनविभागाला सुनावले*
रत्नागिरीच्या प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनारी स्थानिकांच्या स्टॉलवर वनविभागाने केलेल्या कारवाईवरून पालकमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पर्यटनाला शिस्त लावताना स्थानिकांच्या रोजगाराकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका सामंत यांनी घेतली. आपल्या मतदारसंघात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आपल्याला पूर्वकल्पना द्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
*पर्यटन विकासावर भर*
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
आरे-वारे, भाट्ये, नेवरे ते गणपतीपुळे या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर प्रत्येकी पाच ते सात कोटी रुपयांचे आकर्षक पर्यटन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. ‘सिंधुरत्न’ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यटनाचा समतोल विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फॉलो करा | माई मीडिया 24
#Ratnagiri #UdaySamant #AareWareBeach #KonkanTourism #Sindhuratna
—






















