Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव विजयादशमीचा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यशाची नवी पहाट...

विजयादशमीचा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यशाची नवी पहाट घेऊन येवो!

33
0

विजयादशमी अर्थात दसरा हा सण सत्याचा असत्यावर, सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर आणि ज्ञानाचा अज्ञानावर विजय मिळविण्याची प्रेरणा देणारा मंगलपर्व आहे.

हा सण आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ, सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याची शिकवण आणि समाजात प्रेम, बंधुभाव व सद्भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देतो.

या विजयादशमीच्या पावन पर्वावर प्रत्येकाच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडथळ्यांचे सीमोल्लंघन होवो, प्रत्येकाच्या स्वप्नांना यशाचे सोनेरी कोंदण लाभो आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा रथ अधिक वेगाने पुढे जावो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

— प्रताप सरनाईक

परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here