Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग ‘जलसेवा संकल्प अभियान २०२६’ – समारोप कार्यक्रम!

‘जलसेवा संकल्प अभियान २०२६’ – समारोप कार्यक्रम!

34
0

‘जलसेवा संकल्प अभियान २०२६’ – समारोप कार्यक्रम!

आज रत्नागिरी येथे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘जलसेवा संकल्प अभियान २०२६’च्या समारोप कार्यक्रम ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जलसंवर्धन, पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.

जलसंवर्धन, पाण्याचे योग्य नियोजन आणि जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक आहे. ‘जलसंवर्धन हीच समृद्धीची गुरुकिल्ली’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल भा. प्र. से., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे भा. प्र. से, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब जसंडे, प्रांत साहेब जीवन देसाई, महेश सुर्वे, विजय पाटील, विवेक सोनार यांच्यासह विविध मान्यवर आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Shivsena – शिवसेना Devendra Fadnavis Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे

#udaysamant #udaysamantsaheb #JalsevaSankalpAbhiyan2026 #जलसेवासंकल्पअभियान #जलसंवर्धन #जलसंधारण #जलसुरक्षितमहाराष्ट्र #Ratnagiri #WaterConservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here