Home मुंबई *सुसज्ज मनोरा आमदार निवासची नूतन वास्तू फेब्रुवारी, २०२८ पूर्वी आमदारांच्या सेवेत…*

*सुसज्ज मनोरा आमदार निवासची नूतन वास्तू फेब्रुवारी, २०२८ पूर्वी आमदारांच्या सेवेत…*

37
0

*सुसज्ज मनोरा आमदार निवासची नूतन वास्तू फेब्रुवारी, २०२८ पूर्वी आमदारांच्या सेवेत…*
*उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तुचे वैशिष्टय जपण्यात यावे- विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे*

मुंबई दिनांक ९ ऑक्टोबर, महाराष्ट्र विधानमंडळ जवळील नूतन मनोरा आमदार निवासचे बांधकाम कार्य वेगाने प्रगतीपथावर असून ‘अ आणि ‘ब’ असे इमारतीचे दोन्ही मनोरे सर्व सुसज्ज सोयी सुविधांसह फेब्रुवारी, २०२८ पूर्वी आमदारांच्या सेवेत येतील. “अ” मनोऱ्याचे सर्व २९ मजले बांधून पूर्ण झाले आहेत. तर “ब” मनोऱ्याचे ४२पैकी ३४ मजले पूर्ण झाले आहेत. आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी भेट देवून बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व संबंधितांना उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधत वास्तुचे वैशिष्टय जपण्यात यावे, काळजीपूर्वक वापर व्हावा यादृष्टीने नियमावली सुनिश्चित करण्यात यावी तसेच अगोदरच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन व्हावे असे निदेश दिले.

सर्व सन्माननीय सदस्य यांच्यासाठी तसेच त्यांचे स्वीय सहायक, अभ्यागत, कार्यालय यादृष्टीने एकत्रित असा सुसज्ज निवासी कक्ष या नूतन मनोरा आमदार निवासमध्ये तयार करण्यात येत आहे. उपहारगृहे, पार्किंग, बैठक कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. या पाहणी प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-५ शिवदर्शन साठ्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता, प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर, वास्तुविशारद अतुल प्रभु, प्रकल्प व्यवस्थापक(एल अँड टी) सतिश राघवन, प्रकल्प सल्लागार फोट्रेस इन्फ्राकॉम चे कैलास हे उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here