Home मुख्य बातम्या *चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून सोमवार, दि. 12 ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध...

*चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून सोमवार, दि. 12 ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या : डॉ. नीलम गोऱ्हे*

41
0

*चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून सोमवार, दि. 12 ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या : डॉ. नीलम गोऱ्हे*

*25 सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतरही पाहणी नाही – व्यक्त केला खेद*

*उदगीर, दि. 8 ऑक्टोबर -* चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार, दि. 12 ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती *डॉ. नीलम गोऱ्हे* यांनी प्रशासनाला दिल्या.

मराठवाडा दौऱ्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी *उदगीर तालुक्यातील करडखेल, दिग्रज आणि साताळा* येथे थेट बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

*ठळक मुद्दे -*

– *2000 जनावरांसाठी* चाऱ्याची गरज – ग्रामस्थांची मागणी – जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करणार
– *तलाठी, सरपंच* यांनी जनावरे व मालकांची यादी तातडीने तयार करावी
– *शासन निर्णयाची अंमलबजावणी* – लाभ थेट गावापर्यंत पोहोचावा
– *पाहणीत उपस्थित -* माजी आ. सुधाकर भालेराव, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, सुनीता मोरे, जि.प. चंद्रकांत टेंगेटोळ, सरपंच पांडुरंग ढगे, कैलास माने, बापुराव माने आदी

*माजी आ. भालेराव यांची मागणी -* पिकाचा खर्चही वसूळ नाही, विहिरी-बोअर आटल्या – शेतकऱ्यांना भरीव मदत, कर्जमाफी, वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत, भूमिहीन मजुरांना रोजगार द्यावा.

*डॉ. गोऱ्हे यांचे आश्वासन -*
– पिण्याच्या पाण्यासाठी टँकर
– पीककर्ज पुनर्गठन, वसुलीला स्थगिती
– रोजगार हमीची कामे सुरू करून स्थलांतर थांबवणार
– आमदार निधीतून पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी *₹25 लाखांपर्यंत* मदत – चाऱ्यासाठी निधी वापरता येईल का याची तपासणी
– गर्भवती महिला, मुले, वृद्ध, दिव्यांगांच्या आरोग्य व पोषणाकडे विशेष लक्ष

> *“दुष्काळाचा प्रश्न राजकारणापलीकडचा आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे” – डॉ. नीलम गोऱ्हे*

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here