Home मुंबई *१७ ऑक्टोबरला ‘अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा’ कार्यक्रम*

*१७ ऑक्टोबरला ‘अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा’ कार्यक्रम*

51
0

*१७ ऑक्टोबरला ‘अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा’ कार्यक्रम*

*मुंबई :*

बोरीवली पश्चिम येथील कै. प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरातील नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृहात शनिवार, १७ ऑक्टोबरला ‘अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालनकर यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *दहा प्रतिभावंतांचा सन्मान* करण्यात येणार आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त ओडिसी नृत्यगुरू *शुभदा वराडकर* यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. शिवचरित्र अभ्यासक *राजू देसाई* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अपरिचित इतिहासावर व्याख्यान देतील.

*सन्मानितांमध्ये -*
साहित्यिक रवि मल्ल्या, अभिनेते अनिल गवस, क्रिकेट प्रशिक्षक शेखर वराडकर, कवी विजय तारी, प्रा. नयना रेगे, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, डॉ. प्रा. सरिता वाकोदे, श्रीपाद राजगुरू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला *स्वररंग प्रतिष्ठानचे* सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here