*महाराष्ट्रात संविधानाचे राज्य आहे का जंगलराज, काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई कशासाठी? खा. वर्षा गायकवाड.*
*देवेंद्र फडणविसांनी काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसवले, आम्ही वर्षा बंगल्यावर घुसायचे का ?*
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २६
आदिवासी विद्यार्थी त्यांच्या मागणा घेऊन मुंबईत आले असताना रात्री काँग्रेस कार्यालयात विश्रांती घेत होते पण पोलिसांनी विद्यार्थ्यांना झोपेतून उठवून ताब्यात घेतले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांच्या भविष्याशी खेळू नका. काँग्रेस कार्यालयात घुसण्याची हिम्मत कशी केली, तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयात पोलिस घुसवले आम्ही वर्षा बंगल्यावर घुसायचे का, असा संतप्त सवाल करत महाराष्ट्रात संविधानाचे राज्य आहे का जंगलराज, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
काँग्रेस कार्यालयात घुसून पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचे समताच खासदार वर्षा गायकवाड यांनी टिळक भवनला भेट दिली. विद्यार्थांची विचारपूस केली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही म्हणून ते मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी भेटून त्यांच्या मागण्या समजून घ्यायला हव्या होत्या पण त्यांनी त्यांच्यावरच पोलीस कारवाई केली. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण त्यांना आंदोलनही करु दिले जात नाही. भाजपा सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करत आहे. एखाद्या पक्षाच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे कसे काय घुसता. गुन्हेगार मंत्रालयात खुलेआम फिरतात, गुन्हेगारांचे कटआऊट लागतात आणि देवेंद्र फडणविसांचे पोलिस विद्यार्थ्यांवर कारवाई करतात. टिळक भवन या काँग्रेस कार्यालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, पण आज पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. टिळक भवनला पोलिस छावणी बनवले आहे. विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे पण ते घाबरणार नाहीत आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतील व त्यांचा तो अधिकार आहे.
भाजपा सरकारवर विद्यार्थ्यांचाही आता विश्वास राहिलेला नाही. आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तर पुण्यात MPSC चे विद्यार्थी पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पेरफुटी, एमपीएससीचे कार्यपद्धती व आयोगाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. MPSC ची विश्वासार्हता आता राहिलेली नाही. MPSC चा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा मित्र आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. विद्यार्थांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..






















