*MAI MEDIA 24 – सातारा | लोककला विशेष* 🎭
*जल्लोष लोककलेचा – बालरंगभूमी परिषद सातारा शाखेचा दिमाखदार उत्सव संपन्न*
*सातारा:* महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा नव्या पिढीत रुजवण्यासाठी अखिल भारतीय बालरंगभूमी परिषद, सातारा शाखेने आयोजित केलेल्या *‘जल्लोष लोककलेचा’* या भव्य महोत्सवाला चिमुकल्या कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक लोककलांच्या अप्रतिम सादरीकरणाने रंगमंच अक्षरशः उजळून निघाला.
या दिमाखदार सोहळ्यास *अखिल भारतीय बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा एड नीलम शिर्के-सामंत* यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी बालकलाकारांच्या प्रतिभेचे भरभरून कौतुक केले व बालरंगभूमी चळवळीचा विस्तार सातत्याने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास *सातारा शाखा अध्यक्षा सौ. रसिका केसकर*, सातारा शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर परीक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलागुणांचा गौरव करत विजेत्या बालचमूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
*सर्व विजेत्या व सहभागी बालकलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!* 💐👏
—
MAI MEDIA 24 – 24 तास सत्य, विश्वास, निर्भीड पत्रकारिता*
#BalrangbhumiParishad #Satara #JalloshLokkalecha #FolkArt #MAIMEDIA24






















