*तरुणांना जागतिक स्तरावर रोजगार देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*• SNDT येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभाचा कोकण-नाशिक विभागात शुभारंभ*
*• १ लाख नोंदणी, २५ हजार नोकऱ्या, ४०० मेळावे*
*मुंबई, दि. २९:* “AI, सेमीकंडक्टरच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही, अपस्किलिंग हीच काळाची गरज आहे. २८ देशांमध्ये मनुष्यबळाची मागणी आहे, महाराष्ट्राच्या तरुणाला ग्लोबल बनवणार,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज SNDT महिला विद्यापीठात केले.
कौशल्य विकास विभागाच्या वतीने आयोजित *विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचा* शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी दोन तरुणींना थेट नियुक्तीपत्रे दिली आणि सर्व स्टॉलची पाहणी केली.
*मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले,* १ लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे, ६१ हजार जणांना मोफत प्रशिक्षण दिले, ७०% रोजगार दिल्याशिवाय थांबणार नाही.
मागच्या पडद्यावर कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्हे एकाच वेळी ऑनलाईन जोडले गेले होते.
*फोटो कॅप्श*
_मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज SNDT येथे रोजगार महाकुंभाचा शुभारंभ करून तरुणींना नियुक्तीपत्रे दिली व विविध कंपन्यांच्या स्टॉलची पाहणी केली._






















