Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव दुष्काळाचे राजकारण करताना सरकारला लाज वाटली पाहिजे

दुष्काळाचे राजकारण करताना सरकारला लाज वाटली पाहिजे

42
0

दुष्काळाचे राजकारण करताना सरकारला लाज वाटली पाहिजे

महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना निर्ल्लज महायुती सरकार दुष्काळ जाहीर करताना भेदभावाचे राजकारण करत आहे. राज्यातील ३३ पैकी तब्बल २८ मंत्र्यांचे तालुके पहिल्याच यादीत दुष्काळग्रस्त घोषित होतात. पण दुष्काळाने होरपळनारा ब्रह्मपुरी तालुक्याचा शेतकरी मात्र वंचित ठेवण्यात आला आहे. जिथे विरोधकांचे आमदार आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांकडे एकही मंत्री फिरकला नाही. विरोधकांच्या मतदारसंघातील शेतकरी महाराष्ट्राचे नाहीत का? असा प्रश्न शेतकरी सरकारला विचारत आहेत .

केवळ स्वतःच्या मतदारसंघांची सोय लावून घेताना सत्तेतील मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक असा भेद करणे म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. निसर्गाने शेतकऱ्यांशी वैर साधलेच आहे, पण सरकारनेही जर असा निर्लज्ज राजकीय सूड उगारत असेल, तर जनता या सरकारला माफ करणार नाही.

राजकीय भेदभाव बाजूला ठेवून ब्रह्मपुरी तालुक्यासह सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यांचा तातडीने दुष्काळी यादीत समावेश झाला पहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरून या असंवेदनशील सरकारला आम्ही जाब विचारू.

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@bharanemamaNCP

#farmers #farmerslife #bramhapuri #maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here