Home मुंबई *SIR मोहिमेवरून काँग्रेसचा निवडणूक आयोगाला घेराव!*

*SIR मोहिमेवरून काँग्रेसचा निवडणूक आयोगाला घेराव!*

54
0

*SIR मोहिमेवरून काँग्रेसचा निवडणूक आयोगाला घेराव!*

*SIR साठी १२ दिवस पुरेसे नाहीत, २ महिने मुदतवाढ द्या – काँग्रेसची मागणी*

*• प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्र*

*मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२६:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने *SIR (Special Intensive Revision) मोहिमेसाठी* २ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. भारत निवडणूक आयोगाने फक्त १२ दिवसांची वाढ दिल्याने हे काम पूर्ण होणे अशक्य असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांनी केला आहे.

*दि. २२ सप्टेंबर रोजी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर* आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. (जावक क्र. ४८१/२०२६)

*पत्रातील ३ मोठे मुद्दे:*

*१. १ कोटी ९४ लाखांपैकी फक्त ३ लाख ९० हजार नोंदणी:*
ASD DO यादीतील १ कोटी ५४ लाख आणि ४० लाख नव युवक/युवतींपैकी फक्त ३ लाख ९० हजार नागरिकांनीच नमुना अर्ज ६ भरला आहे. सर्व्हर डाऊन, आधार-मोबाईल लिंक नाही, मराठी-इंग्लिश नावात फरक यामुळे मतदारांना प्रचंड त्रास होत आहे. नमुना अर्ज ६ मधील चुका सांगूनही नवीन छपाई झाली नाही.

*२. BLO शिक्षक आहेत, वेळ नाही:*
शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. अनेक BLO शिक्षक आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. नवरात्र उत्सव आहे. त्यामुळे १२ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना मतदार नोंदणीसाठी वेळ पुरेसा नाही. BLO घरोघर नोटीस वाजवत आहेत, मग कागदपत्रे गोळा करणार, नवीन अर्ज कोण स्वीकारणार?

*३. लाखो दुबार मतदार – यादीच घोळ:*
Duplication software वापरूनही प्रारूप यादीत लाखो दुबार नावे प्रसिद्ध झालीत. एकाच लोकसभा मतदारसंघात २५,००० हून अधिक दुबार मतदारांची यादी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे. ही नावे वगळावीत.

*काँग्रेसच्या ३ मागण्या:*
१. दावे दाखल करण्यास २ महिन्यांची मुदतवाढ द्यावी.
२. दिल्लीप्रमाणे दररोज किती ६/७/८ क्रमांकाचे अर्ज आले याची विधानसभा निहाय आकडेवारी जाहीर करावी.
३. दुबार मतदारांची फेरपडताळणी करून नावे वगळावीत.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here