Home मुंबई *ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयात जागा देणार – चंद्रशेखर बावनकुळे*

*ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयात जागा देणार – चंद्रशेखर बावनकुळे*

55
0

*ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयात जागा देणार – चंद्रशेखर बावनकुळे*

*• उपसमितीच्या बैठकीत महसूलमंत्र्यांचे कडक निर्देश – चालढकल खपवून घेणार नाही*
*• महाज्योतीसाठी ३०० कोटी, २०० कोटींचे समता भवन, महात्मा फुले त्रिशताब्दी उत्सव*

*मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२६:* इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महसूलसह सर्व शासकीय विभागांच्या जागा *फक्त १ रुपयात* उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करा, असे कडक निर्देश *ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे* यांनी आज दिले.

“गेल्या बैठकीत ठरलेल्या प्रस्तावावर प्रशासनाने चालढकल केली तर गय केली जाणार नाही. ओबीसींच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशाराच बावनकुळेंनी दिला.

*मंत्रालयात झालेल्या ५ व्या बैठकीतील १२ मोठे निर्णय:*

१. *१ रुपयात जागा:* OBC वसतिगृह, महाज्योती कार्यालयांसाठी सर्व सरकारी जागा १ रुपयात.
२. *३०० कोटी महाज्योतीसाठी:* वसतिगृह योजना, वनार्टी, परदेशी शिष्यवृत्ती प्रस्ताव तातडीने मंजूर करणार.
३. *इतर समाजाप्रमाणे सुविधा:* इतर समाजाला मिळतात तशाच सर्व सुविधा OBC लाही प्राधान्याने द्या.
४. *प्रलंबित बॅकलॉग भरा:* वनमंत्री *गणेश नाईक* यांनी शासकीय सेवेतील OBC चा संपूर्ण बॅकलॉग त्वरित भरावा अशी मागणी केली.
५. *२०० कोटींचे समता भवन:* मंत्री *छगन भुजबळ* यांच्या मागणीनुसार बार्टीच्या धर्तीवर ‘क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन’ साठी २०० कोटींची तरतूद.
६. *तृतीय रत्न नाटक:* महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाचे राज्यभर प्रयोग करणार.
७. *फुले चित्रपट:* मंत्री *पंकजा मुंडे* यांनी फुले दाम्पत्याच्या जीवनावर चित्रपट निर्मितीची मागणी केली.
८. *त्रिशताब्दी उत्सव:* महात्मा फुले यांच्यावर समग्र ग्रंथ, भव्य चित्ररथ, कॅलेंडर आणि नागपूर येथे विशेष मॅरेथॉनचे आयोजन.

यावेळी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, अतुल सावे आदी उपस्थित होते.

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here