Home नाशिक हजार शिक्षकांची बोगस भरती अन् एकही फाईल नाही!*

हजार शिक्षकांची बोगस भरती अन् एकही फाईल नाही!*

50
0

*🚨 हजार शिक्षकांची बोगस भरती अन् एकही फाईल नाही!*

*हजार बोगस भरती, फाईलच गायब – हायकोर्ट संतापले!”*

*हायकोर्टाचे ताशेरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांचा जामीन फेटाळला*

*नाशिक:* बोगस शिक्षक भरतीचा कोट्यवधींचा घोटाळा सुरू असताना यंत्रणा काय करत होती? फाईलच अस्तित्वात नाही, जाहिरात नाही, मुलाखत नाही, तरीही मान्यता आणि पगार कसा काय सुरू झाला? अशा कडक शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासकीय कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (दि. 24) शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. कुंवर यांचा जामीन कोर्टाने फेटाळला. नाशिकच्या एसआयटीने तपास केला आहे.

*सरकारी वकिलांनीच कोर्टात कबूल केले -* या घोटाळ्यातील १,००० हून अधिक बोगस नियुक्त्यांची एकही मूळ फाईल शिक्षण विभागात सापडत नाही. त्यामुळे न्यायालयाने कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली.

*कोर्टाने काय विचारले?*
इतका मोठा घोटाळा असूनही राज्य सरकारचा तपास योग्य दिशेने होत आहे का? ही बाब महत्त्वाची आहे. वारंवार तपास अधिकारी बदलले जात आहेत, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. बोगस टीईटी प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून १० वर्षांपासून पगार काढला जात होता, तेव्हा शिक्षण विभागाचे अधिकारी, उपसंचालक, शिक्षणाधिकारी काय करत होते? असा सवाल विचारला.

*प्रकरण काय आहे?*
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील महेंद पाटील यांना १५ जून २०१६ पासून नियुक्ती दाखवून २५ फेब्रुवारी २०२४ ला शिक्षणाधिकारी कुंवर यांनी मान्यता दिली. त्या प्रस्तावाची फाईलच शिक्षण विभागात नाही. अशा एकाच संस्थेत ५१० हून अधिक बोगस प्रोफाईल तयार झाल्याचा संशय एसआयटीला आहे. त्याच अनुषंगाने कुंवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जामीन अर्जावर ही सुनावणी पार पडली.

—

टाकू का वेबवर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here