Home मुंबई SIR ची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करा’ – राज ठाकरेंची मागणी*

SIR ची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करा’ – राज ठाकरेंची मागणी*

41
0

*🗳️ ‘SIR ची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करा’ – राज ठाकरेंची मागणी*

मुंबई – निवडणूक आयोगाच्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,
“ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवून घेत आहेत. गेले २ दिवस ज्ञानेश कुमार गप्प आहेत आणि त्यांना बोलतं करणारेही गायब आहेत.”

भाजपने २०२५ पासून SIR हे नवं अस्त्र हातात घेतलं असून, सत्तेचा अमरपट्टा मिळवण्यासाठी निवडणूक आयुक्तांसारख्या लोकांना हाताशी धरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

SIR मध्ये प्रचंड घोळ झाल्याचे निवडणूक आयुक्तच बोलत असल्याने, ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे.

तसेच यापुढील सर्व निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं करावं, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here